उदगीर नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडली तर उर्वरित राहिलेल्या तीन प्रभागाचे मतदान आज पार पडत असून २१ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे, निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून शासकीय तंत्र प्रशाला केंद्र देगलूर रोड उदगीर या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे,मतमोजणीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावला असून मतमोजणी केंद्र परिसरात प्रशासनाने मतमोजणीसाठीची पूर्वतयारी सुरू केली आहे