नगरपरिषद निवडणुकांची धामधूम अंतिम टप्प्यात पोहोचली असून सोमवारी (दि. १७) नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने पवनीतील राजकीय वातावरणाचा तापमान उच्चांक गाठला. विविध पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांनी नगरपरिषद कार्यालयात मोठी गर्दी करून शक्तीप्रदर्शन केले. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त सोमवारीच नगराध्यक्ष पदासाठी ८ अर्ज तर नगरसेवक पदासाठी तब्बल ७४ नामनिर्देशन पत्र सादर झाले.