दारव्हा: राजुरा येथे दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त
दारव्हा तालुक्यातील राजुरा गावात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्यामुळे नागरिकांना पोटदुखी, जुलाब आणि संडास लागण्याच्या आजारांनी ग्रासले आहे. ग्रामपंचायत च्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार ग्रामस्थ किशोर राठोड यांनी गटविकास अधिकारी यांना दि. ६ ऑक्टोंबर ला दुपारी एक वाजता दरम्यान केली आहे.