चाकूर: चाकुर तालुक्यातील गांजूर येथील शेतकरी संतोष भानुदास पवार यांची सोयाबीनची बनीम आगीच्या भक्ष्यस्थानी
Chakur, Latur | Oct 19, 2025 चाकुर तालुक्यातील गांजूर येथील शेतकरी संतोष भानुदास पवार यांची सोयाबीनची बनीम आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. या आगीत शेतकऱ्याचे लाखोच रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण सोयाबीनचा साठा जळून खाक झाला. शेतकरी दिवसभर शेतात मेहनत करून काढलेले पीक काही क्षणात राख झाले.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्ती कडून बानी जाळली आल्याचे सांगण्यात आले