चिखली: सिद्धार्थ नगर येथून 18 वर्षीय युवती बेपत्ता हरवण्याची तक्रार चिखली पोलीस स्टेशन येथे दाखल
चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिखली शहरातील सिद्धार्थ नगर वार्ड क्रमांक 20 येथून 18 वर्षीय युवती साक्षी काकडे बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित नातेवाईकांनी 23 सप्टेंबर रोजी चिखली पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु, कुठेही पत्ता न लागल्यामुळे नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार चिखली पोलीस स्टेशन येथे दाखल केली असून, या घटनेचा पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस करीत आहे