हिंगणा: सावळी बीबी येथे शेतकऱ्याने विषारी औषध पेऊन केली आत्महत्या
Hingna, Nagpur | Oct 23, 2025 सततचा विलास ढोडरे पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे खरीप पिकाची नापिकी झाल्याने कर्जाची परतफेड कशी करायची व वर्षभराचा खर्च कसा भागवायचा, याच विवंचनेत शेतकऱ्याने घरी फवारणीचे विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (बिबी) येथे घडली.विलास अवधूत ढोडरे (३६, रा. सावळी बिबी, ता. हिंगणा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विलासकडे स्वतःच्या मालकी हक्काची किंवा वडिलोपार्जित शेती नसली तरी तो मागील काही वर्षापासून गावातील शेतकऱ्यांची शेती ठेक्याचे करायचा.