बुलढाणा: देऊळघाट येथील तरुणाचा विद्युत शॉक लागून मृत्यू
मोल मजुरी करणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाला विद्युत शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूल जवळच्या एका हार्डवेअरच्या दुकानात घडली आहे.शेख रेहान शेख साबीर वय 23 वर्ष असे मृतकाचे नाव आहे.