वैजापूर: नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबियांसाठी दिला १ दिवसाचा पगार
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव व ईतर बांधव नैसर्गिक आपत्तीत आहेत याचे भान ठेवत पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन या आपद्ग्रस्त नागरिकांना देण्याचे मान्य केले आहे. याची जाणीव ठेवत पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक भागवत बिघोत (राजपूत)यांनी दिवाळी साठी फुल न फुलांची पाकळी म्हणून पालिकेच्या कामगारांना एक गणवेष व दिवाळी मिठाईचा मोठा बॉक्स शनिवार(ता.१८)रोजी वाटप केले.