मारेगाव: तालुक्यातून अपहरण केलेल्या 3 भावंडांची सुखरुप सुटका,एलसीबीची कारवाई, आरोपीला वर्धा जिल्ह्यातून अटक
मारेगाव तालुक्यातील एका शेतमजूर दांपत्याच्या तीन अल्पवयीन अपत्यांना फूस लावून पळवून नेले होते. अपहरण करणा-या आरोपीला एलसीबी पथकाने वर्धा जिल्ह्यातून अटक केली. 19 सप्टेंबर रोजी मारेगाव तालुक्यातील एका शेतशिवारात शेतमजुरी करणाऱ्या दांपत्याची तीन अल्पवयीन मुले एक मुलगी (वय ९) आणि दोन मुले - फूस लावून पळवून नेण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी देविदास अंगदास वावरे (वय ४४) हा मुळचा पांढरकवडा येथील रहिवासी असून त्याच्यावर नागपूर व तेलंगणात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.