नवरात्रीच्या निमित्ताने लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीसह इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज करवीर निवासिनी अंबाबाई देवीला साकडे घालून जिल्ह्यात एक लाख स्वाक्षरी मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक शिवानंद स्वामी यांनी महाद्वार रोड या परिसरात दिली आहे.