आज दिनांक 22 डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन तालुक्यातील भोकरदन ते राजुर या मुख्य मार्गावर राजुर गावाजवळ इंडिका कारचा व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये इंडिका कार क्रमांक एम एच 21 व्ही 2866 व दुचाकीचा अपघात झाला असून यामध्ये दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झाला असून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमींना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून या अपघातामुळे मुख्य मार्गावर काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.