गडचिरोली: आरमोरी शहरातील बाजारपेठ वॉर्डातील जिल्हा परिषद शाळा अंगणवाडीसमोरील खड्डेमय रस्त्यात लोकहित संघर्ष समितीने केली धान रोवणी
शैक्षणिक नगरी म्हणून ओळख असलेल्या आरमोरी शहरातील बाजारपेठ वॉर्डातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी समोरील मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले. पावसाळ्यात या खड्यात पाणी साचल्याने डबक्याचे स्वरुप निर्माण झाल्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना स्थानिक न. प. प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने प्रशासनाप्रती तीव्र रोष व्यक्त करीत लोकहित संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खड्डेमय रस्त्यावर धान रोवणी करीत अनोख्या पद्धतीने नगरपरिषदेचा निषेध केला