सेलू: धामणगाव येथे एकास लाथाबुक्क्यांनी मारहाण; जीवे मारण्याची धमकी, सेलू पोलिसांत गुन्हा दाखल
Seloo, Wardha | Nov 10, 2025 तालुक्यातील धामणगाव येथे किरकोळ वादातून एकास शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना सोमवारी (ता. 10 नोव्हेंबरला) सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. भाऊराव महादेव करलुके (वय 40, रा. धामणगाव) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या फिर्यादीवरून आणि वैद्यकीय अहवालावरून आरोपी अनिकेत टेकाम (रा. धामणगाव) याच्याविरुद्ध दुपारी 2.45 वाजता सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती सेलू पोलिसांकडून देण्यात आली.