धारूर: हिंगणी येथील सरस्वती धरण सांडव्यातून पाण्याचा विसर्ग;सतर्कतेचा इशारा
Dharur, Beed | Sep 15, 2025 धारुर तालुक्यातील हिंगणी येथे सरस्वती धरण परिसरात मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे.यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सरपंच योगेश सोळंके यांनी सोमवारी, 15 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ही माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामस्थांनी नदीकाठी अनावश्यक वावर करू नये, जनावरे व शेतीसाठी लागणारे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे,