आज शुक्रवार दिनांक 30 जानेवारी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार कळमेश्वर तहसील येथील कळंबी रोडवरील चव्हाण यादी भंडार कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली त्वरित कळमेश्वर मोहपा वाडी येथील अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले सदर घटनेमध्ये 15 ते 20 लाखाचे नुकसान झालेले आहे