येथील करंजगाव शिवारात शेतात काम करत असलेल्या मजुरांना अचानक बिबट्याचा बछडा दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला मादी बिबट जवळच असण्याची शक्यता गृहीत धरून मजूर व ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली असता मादी बिबट दिसून आली नाही. मात्र बछडा मोकाट फिरत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी सावध भूमिका घेत बछड्याला पकडून एका लाकडी खांबाला बांधून ठेवले आणि तात्काळ वनविभागाला माहिती दिली.