सेलू: सुरगाव शिवारात शेतातील गोठ्यातून शेतीपोयोगी साहित्याची चोरी; सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Oct 13, 2025 शेतातील गोठ्याचे कुलूप तोडून गोठ्यात ठेवून असलेले कृषी उपयोगी साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना ता. १३ सोमवारला मध्यरात्री ३ ते ४ वाजताच्या सुमारास तालुक्यातील मौजा सुरगाव शेतशिवारात घडली. यात शेतकऱ्याचे ४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी निळकंठ भाऊरावजी उमाटे वय ७० वर्ष रा. पवनार यांनी आज दुपारी १.३० वाजता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून मिळाली.