औंढा नागनाथ: बसस्थानका समोर पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीचे वाहन पकडले; 15 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त,एकावर गुन्हा दाखल
औंढा नागनाथ येथील बस स्थानकासमोर रात्र गस्तीदरम्यान दिनांक 25 नोव्हेंबर मंगळवार रोजी पहाटे साडेतीन वाजता अवैध वाळू वाहतुक करणारे विना क्रमांकाचे टिप्पर वाहन पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले,जमादार गजानन गिरी,शाहेद सय्यद,विलास पाईकराव सह पोलिसांनी कारवाई करून पकडले आहे यामध्ये पोलिसांनी वाहनासह वाळू असा 15 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त करून पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले यांच्या फिर्यादीवरून एकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला