भाजपने केलेल्या विकासकामांच्या जोरावर आज या संपूर्ण परिसराचा कायापालट झाला असून, आमचे काम जनतेसमोर आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही बोंबाबोंब केली तरी त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे," अशी घणाघाती टीका माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोपर येथे आयोजित प्रचारावेळी केली. गव्हाण परिसरामध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार प्रचार करण्यात आला.