नेर: मांगलादेवी येथे गोवर्धन पूजा उत्साहात साजरी
Ner, Yavatmal | Oct 22, 2025 लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज दिनांक 22 ऑक्टोबरला मांगलादेवी येथे गोवर्धन पूजा उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. यावेळी गावातील गोपालकांनी आपल्या गोधनाला सकाळीच स्नान घालून रंगीबेरंगी रंगाणी त्यांना सजविले.तसेच फुलांच्या माळा घंटा घालून अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना सजवून त्यांची विधिवत पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली. एकंदरीत अतिशय उत्साहात गोवर्धन पूजा पार पडली.