लातूर: महापालिकेची प्रारूप मतदार यादी गोंधळात; ९०० नागरिकांचे आक्षेप,दुरुस्तीसाठी कर्मचारी रात्रंदिवस तैनात,उपायुक खानसोळे
लातूर : लातूर महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. चुकीची नावे, पत्ते, घर क्रमांकात विसंगती, मतदारांची नावे वगळणे अशा अनेक तक्रारींमुळे तब्बल ९०० हून अधिक नागरिकांनी यादीवर औपचारिक आक्षेप नोंदवले आहेत.या परिस्थितीची गंभीर दखल घेत उपायुक्त डॉ. पंजाबराव खांनसोळे यांनी तातडीने मनपा कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे.