बिनविरोध निवडणुकीत ‘युतीचा खेळ’? अंबडमध्ये कारके यांचा आरोपांचा पाऊस अंबड खरेदी-विक्री महासंघाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या असून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांची युती या निवडणुकीत पाहायला मिळाली. या बिनविरोध निवडणुकांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांनी गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत कारके यांनी या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला असून, यामागे राजकीय दबाव व