धावत्या रेल्वेखाली आल्याने धरणगाव येथीली २४ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता समोर आली आहे. याबाबत सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुभम भिकन मराठे वय २४ रा. मराठे गल्ली, धरणगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.