आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-२०२५ ची रणधुमाळी सुरू झाली असून याच पार्श्वभूमीवर, वाशिम जिल्ह्यातील निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या अशा जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून राजू पाटील राजे आणि जिल्हा निवडणूक प्रभारी पदांची जबाबदारी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने दिल्याची घोषणा करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्राप्त झाले आहे.