वाशिम: जउळका गावाजवळ दोन दुचाकीची समोरा समोर टक्कर, अपघातात तीन ठार, एक गंभीर
Washim, Washim | Oct 30, 2025 जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर - संभाजीनगर महामार्गावर चैत्रबन धाब्याजवळ दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दोन दुचाकी ची समोरसमोर धडकल्याने तिघांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे प्राप्त माहितीनुसार किसन नंदू भोकरे राहणार सावरखेड तालुका पातुर वय अंदाजे वीस वर्ष व दुचाकी वरील साथीदार राजू लठाड राहणार कोळदरा वय अंदाजे सत्तावीस वर्ष हे दोघेजण आपली दुचाकी क्रमांक एम एच-30-B j 5445 क्रमांकाची स्प्लेंडर गाडी घेऊन शेलुबाजार कडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीची टक्कर झाली.