जालना: जालना शहरात मुसळधार पाऊस, साठे नगरातील अनेक घरांमध्ये पाणी; मनपा पथकाकडून पाहणी सुरू..
Jalna, Jalna | Sep 16, 2025 जालना शहरात मुसळधार पाऊस, साठे नगरातील अनेक घरांमध्ये पाणी; मनपा पथकाकडून पाहणी सुरू.. जालना शहरात रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. सलग पाच ते सहा तास मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे शहरातील अनेक भागांमधील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं असून, घरातील संसारोपयोगी साहित्य भिजल्याने नागरीकांचे मोठे नुकसान आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत जालना शहर महानगरपालिकेची विविध पथके शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नुकसानीची पाहणी करत आहेत.