संपूर्ण शहरात तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि. 21 ऑक्टोबर रोजी फटाक्याच्या आतीषबाजी करुन दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात सर्वत्र विविध वस्तूंनी बाजारपेठा फुललेल्या पहावयास मिळाल्या. तर फटाके घेण्यासाठी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच फटाक्यांच्या दुकानांत गर्दी केलेली पहावयास मिळाली. नवीन कपडे, मिठाई, व दिवाळीचा मुहूर्त साधून सोने चांदी व इतर दुकांनामध्ये सुध्दा नागरिकांनी गर्दी केली होती. दिवाळीचा मुहूर्त साधून अनेकांनी आपल्या आराध्यांचे दर्शन घेतले.