उत्तर सोलापूर: युवा सेनेच्या वतीने चार हुतात्मा चौक येथे जोडेमार आंदोलन
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे युवासेना सोलापूर जिल्ह्याच्यावतीने मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी निषेध म्हणून दोषी असलेल्या मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार नारायण राणे यांच्या व्यंगचित्रांच्या प्रतिमांना जोडे मारा आंदोलन करण्यात आले. युवासेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले आणि शहरप्रमुख विठ्ठल वानकर यांच्या नेतृत्वाखाली आणि युवासेनेचे सोलापूर विद्यापीठ प्रमुख लहुजी गायकवाड आदी उपस्थित होते.