नागपूर ग्रामीण: वडधामना येथे ट्रकवर धडकली दुचाकी, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
13 सप्टेंबरला रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास बजाज स्टील कंपनी एमआयडीसी येथे काम करणारे आशिष मिश्रा हे त्यांच्या दुचाकीने मित्र याला मागे बसवून कंपनीतून घरी जात असताना पोलीस ठाणे वाढी हद्दीतील वर्धा येथे त्यांच्या समोरून एक अज्ञात ट्रक चालक वळण घेत असता त्यांची दुचाकी त्या ट्रकवर जाऊन धडकल्याने दुचाकी वरील दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता शालिनीताई मेघे हॉस्पिटल व आशिष मिश्रा यांना तिथून मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला.