समाज माध्यमाबाबत विद्यार्थ्यांनी जागरूक व्हावे राधाकृष्ण देशमुख यांचे प्रतिपादन . विद्यार्थ्यांनी समाज माध्यमाबाबत जागरूकतेने पाहिले पाहिजे असे प्रतिपादन श्री राधाकृष्ण देशमुख माजी अध्यक्ष बाल कल्याण समिती लातूर यांनी जिल्हा परिषद प्रशाला जवळगा येथे बोलताना केले .जवळगा येथे चला बालविवाह हद्दपार करूया या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राधाकृष्ण देशमुख यांनी विविध गोष्टीचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगत त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याचे काम केले .