उमरेड: उमरेड येथे महिलेला गांजा विक्री करताना पोलिसांनी पकडले रंगेहात, दहा किलो 180 ग्राम गांजा जप्त
Umred, Nagpur | Oct 17, 2025 16 ऑक्टोबरला अमली पदार्थ विरोधी कार्यवाही पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उमरेड येथील एका महिलेच्या राहता घरी छापामार कार्यवाही केली. घर चढती दरम्यान महिलेच्या घरून दहा किलो 180 ग्राम गांजा वजन काटा मोबाईल व इतर साहित्य असा एकूण दोन लाख 26 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.