जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीतील एका बंद घरातून ४९ हजार ६०० रुपयांची रोकड आणि ऐवज चोरून नेणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. कासमवाडी परिसरात रविवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून, अटक केलेले दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.