शिरपूर: थाळनेर परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसानाचे पंचनामे करण्याची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
Shirpur, Dhule | Nov 3, 2025 शिरपूर तालुक्यातील थाळनेर परिसरातील शेतकऱ्यांचे नुकत्याच झालेल्या बेमोसमी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत,अशी मागणी थाळनेर विकास सोसायटीच्या वतीने 3 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदन तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार पंकज मगर यांनी स्वीकारले.तसेच निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी,कृषिमंत्री,तसेच शिरपूर यांच्याकडे रवाना करण्यात आली.