अक्कलकुवा: देवगोई घाटात दरड कोसळण्याच्या घटनांना ब्रेक लागणार, शासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत बसवली संरक्षण जाळी
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेतील देवगोई घाटात दरड कोसळण्याच्या घटनांना आता ब्रेक लागणार आहे. शासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत संरक्षण जाळी बसविण्याचे काम पूर्ण केले असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहेत. पावसाळ्यात घाटात वारंवार होणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटना आता थांबणार आहे.