धुळे: भोई सोसायटीत पिण्याची पाईप लाईन टाकणे कामाचा शुभारंभ आमदार यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या अग्रवाल यांच्या हस्ते
Dhule, Dhule | Nov 30, 2025 धुळे शहरातील देवपूर प्रभाग क्रं 2 भोई सोसायटीत गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याची पाईपलाईन नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. या समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते कल्पेश थोरात यांनी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे नागरिकांच्या सोबत लेखी निवेदन देऊन परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात यावी अशी मागणी केली होती. याबाबत शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. त्यानंतर 30 नोव्हेंबर रविवारी दुपारी एक वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान शहराचे