दिग्रस नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल दि. २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. निकालानंतर विजयाच्या उत्साहात काही उमेदवारांनी निवडून आल्याचे प्रमाणपत्र तात्काळ स्वीकारले नव्हते. त्यामुळे दि. २२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता निवडून आलेल्या नगरसेवक प्रमाणपत्र घेण्यासाठी दिग्रस तहसिल कार्यलयात दाखल झाले. तेथे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मयूर राऊत यांच्या हस्ते निवडून आलेल्या उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सर्व नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला.