आमगाव: आसोलीत महिला आरोपीकडून अवैध दारू जप्त, आसोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Amgaon, Gondia | Sep 20, 2025 स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला उपनिरीक्षक वनिता सायकर यांच्या पथकाने आसोली येथील सुषमा योगेश मेश्राम (३७) हिच्या घरावर धाड टाकली. ही कारवाई १९ सप्टेंबर रोजी करण्यात आली. तिच्या घरातून मोहफुलाची दारू, सडवा मोहापास, गाळण्याची भट्टी, प्लॅस्टिक ड्रम, करच्यांसह १८ हजार ३०० रुपयांचा अवैध माल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध कलम ६५ (ब), (क), (ड), (ई), (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.