धुळे शहरातील देवपूर परिसरातील मरीमाता मंदिराच्या विटंबनेच्या प्रकारानंतर आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी तीव्र झाली आहे. या निषेधार्थ आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेऊन निवेदन दिले. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत देवपूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भावना दुखावल्याने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीला लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले.