गोरेगाव: नगरपंचायत निवडणूकीत ८ हजार ६५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार, नगरपंचायत निवडणुकीला घेऊन तहसीलदार यांनी घेतली पत्रकार परिषद
नगरपंचायत निवडणूकीत ८हजार ६५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असुन निवडणुकी दरम्यान सर्वांनी आदर्श आचारसंहीतेचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांनी गुरुवार (ता ०६) नगरपंचायत येथील सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी मुख्याधीकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय परदेशी उपस्थित होते.या निवडणूकीत १७ प्रभाग असून शहीद जान्या तिम्या हायस्कूल येथे १७ मतदान केंद्र राहणार आहेत.