वडवणी: तालुक्यातील सोन्नखोटा उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले; नागरिकांनी सतर्कता बाळगावी!
Wadwani, Beed | Oct 18, 2025 वडवणी तालुक्यातील, उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प, सोन्नखोटा येथून शनिवार दि. 18 ऑक्टोबर रोजी रात्री 7 वाजता धरणाच्या सांडव्याची दोन दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडून 2 23 क्यूसेक्स म्हणजेच 57.29 क्यूमेक्स इतका पाण्याचा विसर्ग कुंडलिका नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणात पाण्याची आवक पाहून विसर्गाचे प्रमाण वाढवले किंवा कमी केले जाऊ शकते. म्हणूनच, नदीकाठावरील आणि पुराचा धोका असलेल्या गावांतील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, नदीपात्राजवळ किंवा पाण्याच्या प्रवाहात जाणे टाळावे.ही सूचना उपविभागीय अ