वैजापूर नगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय बोरनारे यांच्या प्रचारात शहरातील स्वामी समर्थ नगर परिसरात सोमवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रचार सभे दरम्यान शिवनेचे खासदार संदीपान भुमरे आमदार रमेश बोरनारे यांची प्रमुख उपस्थिती होती.वैजापूर शहरात सर्व जाती धर्माला घेऊन चालणाऱ्या शिवसेनेला मतदान करावे असे आवाहन प्रसंगी आमदार रमेश बोरनारे यांनी केले.