नांदेड: सिद्धार्थनगर येथे 17 वर्षीय मुलास बियरची बाॅटल मारून गंभीर दुखापत करणा-या 20 वर्षीय आरोपीवर इतवारा पोलीसात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Dec 1, 2025 सिद्धार्थनगर नांदेड येथे फिर्यादीचे घरासमोर दि 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी सहाच्या सुमारास यातील आरोपी ऋषी बंडु आढाव वय 20 वर्षे याने यातील फिर्यादीस हातातील बियरचे बाटलीने उजव्या हाताचे पंजावर मनगटावर करंगळीवर मारून फॅक्चर केले व थापड धुक्याने मारहाण करून शिवीगाळ करून गंभीर दुखापत केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी रुद्र अतुल ढगे वय 17 वर्ष यांचे फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात आज सायंकाळी गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे