दक्षिण सोलापूर: सिना नदी पूरस्थिती : मंद्रुप परिसरात तात्पुरत्या निवार्यांची सोय, अधिकारी-कर्मचारी नियुक्त...
अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सिना कोळेगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्पातून तसेच भोगावती नदीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून सिना नदीपात्रात तब्बल १,९५,००० क्यूसेक इतका प्रवाह सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंद्रुप तहसील प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरत्या निवार्यांची व्यवस्था केली आहे.