मावळ: इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटात मेघाताई भागवत यांचा दौरा गाजतोय; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, निवडणुकीला नवी रंगत
Mawal, Pune | Oct 19, 2025 इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटात सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मेघाताई भागवत यांनी गावभेटी व संपर्क दौऱ्याला जोरदार सुरुवात केली आहे. प्रत्येक गावात महिलांकडून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून या गटातील निवडणूक आता रंगतदार वळणावर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.