अवैध गौण खनिज वाहतुकीशी संबंधित कारवाईत तहसील कार्यालयाने जप्त केलेला ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून चोरून नेण्यात आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी ट्रकमालकावर गुन्हा दाखल केला आहे.जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर बंदी असतानाही अनेक मार्गांवर सर्रास अशी वाहतूक चालते. जिल्हाधिकारी कार्यालयाचा खनिकर्म विभाग आणि तहसील कार्यालयांकडून नेमण्