गोंदिया: ग्राम बोळुदा येथे खास कार्तिक पौर्णिमा निमित्त
मंडई मेला उत्साहात साजरा
ग्राम बोळुदा येथे खास कार्तिक पौर्णिमा निमित्त मंडई मेला उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी आदर्श न्यू युवा रंगमंच नाट्य कला मंडळ यांच्या सौजन्याने नाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमात ग्रामस्थ तसेच विविध समाजघटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला सुंदर रंगत आणली. हा कार्यक्रम मनोरंजक, सामाजिक जाणिवा दृढ करणारा आणि ग्रामविकासाच्या भावनेला प्रोत्साहन देणारा ठरला. यावेळी जीडीसीसी बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे माजी सभापती विजय राणे आदी मान्यवर उपस्थित होते.