जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती अनुदान प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आणखी एक आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मंगळवार दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सहावा आरोपी रामेश्वर गणेश बारहाते रा. शेवगा ता. अंबड याला अकोला शहरातून पकडण्यात आले असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि आपत्तीमध्ये बाधित शेतकर्यांसाठी अनुदान जाहिर केले होते.