शिरपूर: बिलवाडीतील एकनाथ गोपाळ हत्याकांड प्रकरणी दोषींना फाशीची मागणी,शिरपूर प्रांताधिकारी यांना सकल गोपाळ समाजाचे निवेदन
Shirpur, Dhule | Sep 16, 2025 जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी येथे झालेल्या हाणामारीत एकनाथ लिंबा गोपाळ यांचा खून करण्यात आला. या घटनेचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्र सकल गोपाळ समाज कृती समितीच्या वतीने शिरपूर येथील प्रांताधिकारी डॉ.शरद मंडलिक यांना प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. समितीने निवेदनातून हत्याकांडातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.