गोंदिया: तुमसर येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न, माजी आमदार राजेंद्र जैन यांची उपस्थिती
Gondiya, Gondia | Sep 23, 2025 तुमसर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक शकुंतला सभागृह, तुमसर येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत पक्ष संघटन,पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सुचविण्यात आलेल्या विविध स्थानिक समस्या तसेच त्यावरील उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की,खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आगामी तुमसर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून एक दिलाने काम करण्याचे आवाहन केले.