आज दिनांक 25 डिसेंबरला पोलीस सुत्राकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, इंडिया फायनान्स कंपनी शाखा चांदूरबाजारची फसवणूक करून बँकेच्या सुरक्षारक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार, कोटक महिंद्र बँकेच्या वतीने श्रद्धांजली सुनील कुमार तिवारी यांनी दिनांक 24 डिसेंबरला सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी चांदूरबाजार येथील अकबर हुसेन अब्दुल हुसेन व इकबाल हुसेन अकबर हुसेन याचे वर गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे